bhandara, Gosikhurd Dam News, Bhandara saam tv
महाराष्ट्र

Gosikhurd Dam News : सावधान ! 'गोसीखुर्द'चे सर्व 33 दरवाजे उघडले, चंद्रपूरसह गडचिरोलीला बसणार बँक वाॅटरचा फटका

Bhandara : नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन अभिषेक नामदास (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) यांनी केले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : गोसीखुर्द धरणाचे (gosikhurd dam) सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. (Maharashtra News)

मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत धो धो कोसळणा-या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 33 वक्रदार यावर्षी पहिल्यांदाच उघडण्यात आली आहेत.

या 33 दरवाज्यातून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भंडारा शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नदीनाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे (rain) जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: हरतालिकेच्या दिवशी महिलांचं भाग्य खुलणार; आर्थिक चणचण होणार दूर, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

SCROLL FOR NEXT