Sangli Accident News : सांगलीवाडी टोल नाका ऑफिसला धडकली बस, 16 प्रवासी जखमी

नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
Sangli Accident News :
Sangli Accident News :saam tv
Published On

Sangli News : नाईकबाहुन सांगलीला जाणा-या एसटीचा आज (साेमवार) अपघात झाला. हा अपघात सांगलीवाडी येथे झाला. या अपघातात बसच्या चालक, वाहकासह एकूण 16 प्रवासी जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

Sangli Accident News :
Rasta Roko Andolan : वीज वितरण कंपनीवर ग्रामस्थांचा राेष, कळंब-लातुर महामार्गावरील लोहटा पुर्व गावात छेडलं रास्ता रोको आंदोलन

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : नाईकाहून सांगलीच्या दिशेने जाणा-या बसचे चाक स्लीप झाल्यामुळे हा अपघात झाला. ही बस सांगलीवाडी टोल नाक्याच्या ऑफिसला धडकली. बसचा पूढचा भागाचे माेठे नुकासन झाले आहे.

Sangli Accident News :
Koyna Dam Water Level: दिलासादायक... सातारा, काेल्हापूरात पावसाचा जाेर वाढला; जाणून घ्या राधानगरी, काेयनेतील पाणीसाठा

हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. या अपघातातील जखमींना तातडीने बसमधून (msrtc bus) बाहेर काढले. काहींनी रुग्णवाहिका बाेलावली हाेती. बहुतांश जखमींनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sangli Accident News :
Akola News : ...अवैध शस्त्र विक्रीस येतात कोठून ? अकाेला पोलिसांपुढे माेठे आव्हान

या अपघाताची बातमी कळताच एसटीचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. प्राथमिक माहितीनूसार या बसमध्ये एकूण 43 प्रवासी हाेते. या अपघातात (accident) चालक वाहकासह 16 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com