water leakeage in pandharpur vitthal rukmini mandir  Saam Digital
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाणी झिरपू लागलं, भाविकांत नाराजी; संस्थानची वॉटरप्रूफिंगची ग्वाही

water leakeage in pandharpur vitthal rukmini mandir : सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जतन हे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंदिराला गळती सुरू झाल्याने कामाच्या दर्जा बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

भारत नागणे

पंढरपूर येथील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज (साेमवार) पाण्याची गळती लागल्याचे चित्र हाेते. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात स्लॅबचे पाणी गळू लागले आहे. यामुळे भाविकांत नाराजी पसरली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बाेलताना मंदिर संस्थानने मंदिरात लवकरच वॉटरप्रूफिंगचे कामही सुरु केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

पंढपूर येथील विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा, रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपू लागले. या विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी मंदिरात गळत असल्याने भाविकातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

गळतीवर उपाययोजना केल्या जातील : मंदिर समिती

याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले मागील चार दिवसांपासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सूरू आहे. अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपले आहे. लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी ग्वाही देखील विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT