Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये पाणीबाणी! टप, बादल्या आजच भरून ठेवा; 'या' शहरांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

Water Crisis : गंगापूर रोड, कॉलेज रोडसह प्रभाग क्रमांक ७, ८ आणि ११, १२ या प्रभागात पाणी पुरवठा राहणार बंद राहणार आहे. इतकेच नाही तर शनिवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Ruchika Jadhav

Nashik

उन्हाळा सुरू होण्याआधीच नाशिकमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोडसह ४ प्रभागात शुक्रवारी पाणीबाणी असणार आहे. गंगापूर रोड, कॉलेज रोडसह प्रभाग क्रमांक ७, ८ आणि ११, १२ या प्रभागात पाणी पुरवठा राहणार बंद राहणार आहे.

इतकेच नाही तर शनिवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जल वाहिनीच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणारे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय.

पाणी टंचाईमुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चटके बसण्यास सुरुवात झालीये. एकट्या सिन्नर तालुक्यात दुष्काळाने ४०० हेक्टरवरील गहू तर २५० हेक्टरवरील कांदा पिकाची वाढ खुंटली आहे. ६५० हेक्टरवरील गहू, कांदा संकटात सापडलाय. उत्पादनात २० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.

पाणीबाणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तर रब्बी लागवडीत देखील ३० टक्क्यांची घट झाली आहे. फेब्रुवारीतच भूजल पातळी १०० फुटांहून अधिक खोल गेलीये. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनण्याची चिन्ह दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT