Melghat Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Melghat Water Crisis : मेळघाटात १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा, चिखलदरा तालुक्यात भयावह स्थिती

Amravati News : मेळघाट परिसरात समस्या अधिक तीव्र झाली असून या भागातील ९ गावांची भिस्त पूर्णपणे ट्रॅकरवर अवलंबून आहे. पुढील काही दिवसात हि समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

Rajesh Sonwane

अमरावती : एप्रिल महिन्याच्या मध्यावर अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती तीव्र झाली आहे. सद्यः स्थितीत जिल्ह्यात नऊ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील आठ तसेच चांदूररेल्वे तालुक्यातील एका गावाचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चुन राबविण्यात आलेल्या जलजीवन योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

पाणीटंचाईची झळ सर्वदूर जाणवायला लागली आहे. उन्हाची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे. तसतशी पाणीटंचाईची भीषणता देखील गडद होत चालली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात देखील पाण्याची भीषणता जाणवायला लागली आहे. प्रामुख्याने मेळघाट परिसरात समस्या अधिक तीव्र झाली असून या भागातील ९ गावांची भिस्त पूर्णपणे ट्रॅकरवर अवलंबून आहे. पुढील काही दिवसात हि समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

चिखलदरा तालुक्यात अधिक बिकट स्थिती 
जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक टंचाईची तीव्रता दिसून येत आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना टँकरचे पाणी पुरविण्यात येत आहे. तर याच तालुक्यात १७ खासगी विहिरींचे अधिग्रहनसुद्धा करण्यात आले आहे. त्यापैकी ८ गावांची तहान भागविण्यासाठी आठ टँकरचा वापर केला जात आहे. यामुळे ग्रामस्थांची तहान ट्रॅकरच्या पाण्यावरच भागत आहे. 

जलजीवन मिशन फेल
जिल्ह्यात जवळपास ७५ हातपंप बंद अवस्थेत असल्याने सुरू असलेल्या हातपंपांवर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. हातपंपांच्या दुरुस्तीसाठी असलेल्या पथकामध्ये तंत्रज्ञ कमी असल्याने दुरुस्तीवर परिणाम होत आहे. पर्यायाने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. एकंदरीत या गावांसाठी राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजना पूर्णपणे फेल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT