Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : तोंडगाव टोलप्लाझा तोडफोड; मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

Washim News : टोल नाक्यावर योग्य सुविधा नसल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या विरोधात कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली. या प्रकारानंतर व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दिली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील अकोला- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोलप्लाझा येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी टोलप्लाझा मॅनेजरच्या तक्रारीवरून मनसेच्या तिन कार्यकर्त्यांविरोधात वाशिमच्या ग्रामीण पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशिमच्या अकोला-नांदेड महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून काल तोडफोड करण्यात आली. टोल नाक्यावर योग्य सुविधा नसल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या विरोधात काही कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली. दरम्यान या प्रकारानंतर टोल नाक्यावरील व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दिली आहे

पैशांची मागणी केल्याचाही तक्रारीत उल्लेख

दरम्यान या प्रकरणी टोल मॅनेजरच्या तक्रारीवरून मॅनेजरकडून ५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच टोल प्लाझावर मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आर्थिक नुकसान केल्याची तक्रार वाशिमच्या ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीही तोडफोड करणाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल 
टोलनाका व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला असून या प्रकरणातील तीन जणांची नावं पुढे आली आहेत. यात मनसेच्या वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे, मनसे वाहतूक शहराध्यक्ष उमेश डोलमारे आणि सिताराम चव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध; रायगडमधून विशेष एसटी सेवा

Amravati Crime : अमरावती हादरले; मुलासह आईची निर्घृण हत्या, बदलाच्या भावनेतून घरासमोर येत केले शस्त्राने वार

Jio 3599 Vs Airtel 3599: कोणता प्रीपेड प्लॅन देतो जास्त डेटा आणि खूप फायदे?

OBC reservation issue : राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापना, आजच GR निघणार

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT