Washim Accident Saamtv
महाराष्ट्र

Washim Accident: झाडाखाली आराम करत होते... भरधाव कार आली अन्; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Washim Latest News: वाशिमच्या कारंजा - मूर्तिजापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमी जवळ हा भीषण अपघात झाला.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी

Washim Accident News:

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याची घटना वाशिममध्ये घडली. वाशिमच्या कारंजा - मूर्तिजापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमी जवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिमच्या कारंजा बायपासवरून कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील टी पॉईंटकडे एक भरधाव कार येत होती. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने थेट रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत बसलेल्या दोघांना जबरदस्त धडक दिली.

त्यानंतर कार स्मशानभूमीच्या स्मृती प्रवेशद्वाराला जाऊन धडकली. या अपघातात सावलीत बसलेल्या अब्दुल नइम अब्दुल शकील (वय ३६वर्ष) रा. मज्जिद पुरा व अथर्व अमोल दहातोंडे (वय २३ वर्ष, रा. प्रगतीनगर कारंजा) हे तरुण गंभीर जखमी झाले.

अपघाताच्या घटनेनंतर काही समाजसेवक व स्थानिकांनी जखमीना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुनीर खा मजीद खा वय ४२ वर्ष यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT