Risod Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Risod Bajar Samiti : रिसोड बाजार समिती दहा दिवस राहणार बंद; नाणेटंचाईच्या कारणातून निर्णय

Washim News : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : सध्या नाणे टंचाई भासत असल्याने या कारणाने रिसोड बाजार समिती दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे एन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाला विक्री खासगी बाजार समितीत करावी लागत आहे. 

सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. पेरणीसाठी राखून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. मात्र अशातच (Washim) वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी नाणे टंचाई जाणवत असल्याच्या कारणातून १३ जूनपासून २२ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. 

शेतकऱ्यांची गैरसोय 

शेतकऱ्यांना (Farmer) शेतमाल विक्री करताना गैरसोय व आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच बाजार समिती बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना खासगी बाजारात शेतमाल विकावा लागनार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT