Amravati News : धक्कादायक..चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून महिलेला अमानुष मारहाण; विजेचा शॉकही दिल्याचा आरोप

Amravati news : अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपुते यांच्या घरी घर काम करणाऱ्या नेपाळी महिले विरुद्ध सोन्याची चेन चोरी केल्याची तक्रार केली
Amravati News
Amravati NewsSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: चोरीच्या गुन्ह्यात घर काम करणाऱ्या एका नेपाळी संशयित महिलेला अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतकेच नाही तर गुन्हा कबूल करण्यासाठी महिलेच्या पायाला विजेचा शॉक देऊन व बांधून अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. या धक्कादायक प्रकाराची माहिती महिलेने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे केली. 

Amravati News
Navapur Crime : खांडबारा चोरविहीर परिसरात आढळले मानवी अवयव; एकाच आठवड्यात तिसऱ्या घटनेने परिसरात खळबळ

अमरावतीच्या (Amravati) गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपुते यांच्या घरी घर काम करणाऱ्या नेपाळी महिले विरुद्ध सोन्याची चेन चोरी केल्याची तक्रार केली. मात्र महिलेचे कुठलेही ऐकून न घेता महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून बेशुद्ध होईपर्यंत बेदमपणे मारहाण केली. तसेच विजेचा शॉक सुद्धा पोलिसांनी दिला असा आरोप करण्यात आला आहे. मात्र कुठल्याही प्रकारची चोरी महिलेने केली नाही. तरी देखील मारहाण केल्याने (police) पोलिसांन विरोधात संताप व्यक्त केला जातो. 

Amravati News
Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अमरावतीच्या (Amravati Police) गाडगेनगर पोलीस ठाण्याचा हा प्रकार घडला असून याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कारवाईची मागणी केली आहे. तर या वेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू असे त्यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com