kamargoan rasta roko andolan, washim news saam tv
महाराष्ट्र

Kamargoan Rasta Roko Andolan : उर्दू ज्युनिअर काॅलेजसाठी कामरागव ग्रामस्थांनी राेखला कारंजा - अमरावती मार्ग

पाेलीसांनी आंदाेलनस्थळी बंदाेबस्त ठेवला हाेता.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशिमच्या (washim) कांरजा तालुक्यातील कामरगाव (kamargoan) येथे उर्दु ज्युनिअर काॅलेज सुरू करण्यात यावे या मागणीसाठी विविध संघटनांनी आज (बुधवार) कामरगाव बसस्थानकासमाेर रास्ता राेकाे आंदाेलन (rasta roko andolan) छेडले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी घटनास्थळी पाेलीसांचा बंदाेबस्त हाेता. (Maharashtra News)

कामरगाव येथे उर्दु ज्युनिअर काॅलेज सुरू व्हावे अशी मागणी करीत आज भारतीय लोकशाही संघटनेसह भाजीबाजार व्यापारी संघटना, निराधार व अंपग संघटना यांच्या वतीने कांरजा - अमरावती मार्गावरील कामरगाव बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदाेलनात युवा वर्ग माेठ्या संख्येने सहभागी झाला हाेता.

कामरगाव इथं 10 वी पर्यंत उर्दू शाळा आहे. या परिसरातील अनेक विद्यार्थी उर्दू शाळेत शिक्षण घेतात. मात्र गावात उर्दु ज्युनियर कॉलेज नसल्याने शिक्षणासाठी युवा वर्गास बाहेर गावी जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरात उर्दु ज्युनियर कॉलेज व्हावे यासाठी आंदोलन छेडल्याची माहिती आंदाेलकांनी दिली.

दरम्यान या आंदाेलनामुळे कांरजा-अमरावती मार्गावरील वाहतुक काही काळ प्रभावित झाली होती. पाेलीसांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतल्यानंतर मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

White Shoes: पांढऱ्या शूजवर सतत डाग पडून खराब झालेत? मग 'या' घरगुती टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ

Horoscope : ‘या’ 3 राशींच्या नशिबात पैसा आणि प्रेमाचा योग; केतू गोचर देणार मोठे संकेत

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT