Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : कारंजा येथे एमडी अमली पदार्थ जप्त; ७ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त

Washim News : संशयित कार घेऊन आल्यानंतर पोलिसांनी कार अडवत तपासणी केली. यात कारमध्ये अंमली पदार्थ आढळून आला. या दोघांकडून एम.डी.(मेफॉडॉन) अमली पदार्थ आढळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : अमली पदार्थांची वाहतूक व विक्रीस बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार कारंजा येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून कारमधून वाहतूक केला जाणारा २ लाख ३६ हजार रुपये किंमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.  

वाशिमच्या कारंजा शहराबाहेर एका हॉटेल जवळ सदरची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान दोन इसम कारमधून अमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून संशयित कार घेऊन आल्यानंतर पोलिसांनी कार अडवत तपासणी केली. यात कारमध्ये अंमली पदार्थ आढळून आला. या दोघांकडून एम.डी.(मेफॉडॉन) अमली पदार्थ आढळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.  

७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांच्याजवळून २ लाख ३६ हजार रुपयांचा २४.६० ग्रॅम एम.डी. (मेफॉडॉन) अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय एक कार ज्याची किंमत पाच लाख रुपये असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल कारंजा शहर पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान हा अंमली पदार्थ कोठून आणला आणि कोणाकडे नेण्यात येत होता. याचा अधिक तपास सुरु आहे. मात्र या कारवाईमुळे वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात 
सदरच्या कारवाईत हाशीब उर्फ आरीस खान आसीफ खान (वय ३२, रा. फारुख कॉलनी कारंजा ता. कारंजा जि.वाशिम) व अनिस खान सत्तार खान (वय ५२, रा. मजीतपुरा कारंजा ता. कारंजा जि.वाशिम) या दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपी विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल  करत कारंजा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT