Dharashiv Rain : धाराशिवमध्ये महापुराचा आणखी एक बळी; ओढ्याच्या पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू

Dharashiv News : धाराशिवच्या काही भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने तेरणा नदीला आलेल्या पुरात सापनाई आणि संजीतपूर शिवारात पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतातील पिके पुराच्या पाण्याखाली गेले
Dharashiv Rain
Dharashiv RainSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी- नाल्याना देखील पूर आला आहे. या मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यात एकाच बळी गेला आहे. ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

मागील चार- पाच दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. धाराशिवच्या काही भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने तेरणा नदीला आलेल्या पुरात सापनाई आणि संजीतपूर शिवारात पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतातील पिके पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. 

Dharashiv Rain
Sambhajinagar : आईसाठी दागिने बनविण्यापूर्वीच अनर्थ; भरदिवसा गाडीची डिकी तोडून पावणेतीन लाख लंपास

शेतातून घरी येत असताना मृत्यू 

धाराशिवच्या कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजयकुमार सत्यनारायण जोशी असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून गावातील ओढ्याला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी शेतात असलेल्या म्हशींचे दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यात वाहून विजयकुमार जोशी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

Dharashiv Rain
Heavy Rain : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार; लातूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात दमदार पाऊस

काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या हुंड्या पाण्यात

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी शेतातील पिके काढण्याच्या तयारीला लागला होता. मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर भूम, परंडा, कळंब भागात मुसळधार पाऊस झाल्याने काढून ठेवलेल्या सोयाबीनचे पावसात मोठे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या हुंड्या पाण्यात गेल्या असून काढलेल्या सोयाबीनला पाण्याचा विळखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com