Washim Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Washim Heavy Rain : कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतात पाणी साचल्‍याने नुकसान

कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतात पाणी साचल्‍याने नुकसान

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

वाशिम : वाशिम जिल्ह्यात आज दुपारी काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात रिमझिम (Washim) पाऊस झाला. मात्र रिसोड तालुक्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसला असून कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

राज्‍यातील अनेक भागात पाऊस सक्रीय झाला आहे. यात काही भागामध्‍ये मुसळधार पाऊस होत आहे. दरम्‍यान वाशिम जिल्‍ह्यातील अनेक भागात पावसाने आज दुपारच्‍यावेळी जोरदार हजेरी लावली. यात कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने मोठे नुकसान झाल्‍याचे पहावयास मिळत आहे.

पिकांचे मोठे नुकसान

ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने परिसरातील ओढ्यानाल्यांना पूर आला असून शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नुकताच खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन पीक आणि गेल्या महिन्यात लागवड केलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उशिरा पाऊस झाल्याने पेरणी उशिरा झाली होती. त्यामुळे खरिपाच उत्पन्न घट की काय, अशी चिंता सतावत असताना आता ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

SCROLL FOR NEXT