परभणी : शिक्षणाधिकारी पदाचा गैरफायदा करत खोटे दस्तऐवज केले. याप्रकरणी (Parbhani) परभणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे (Education Officer) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)
परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असताना आशा गरूड व विठ्ठल भुसारे या दोघांनी शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना खोट्या दस्तऐवजांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक, सहशिक्षक, कला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान केल्या. यामुळे शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाचे उपसचिव टि. पा. करपते यांनी निलंबनाचे आदेश काढले आहे.
दोघांचाही कार्यकाळ वादग्रस्त
दोघांनाही पूर्व परवानगीशिवाय (Zilha Parishad) मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी आशा गरुड व विठ्ठल भूसारे यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त राहिला. शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्या विरुध्द मोठा जनक्षोभ उसळला होता. अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करत आंदोलने केली होती. शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर शालेय शिक्षण विभागाने या तक्रारींची दखल दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.