Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : मेंढपाळाच्या पालावरच प्रसूती; डॉक्टर व आशा वर्करमुळे वाचले महिलेचे प्राण

Washim Health Department : सायंकाळच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. याबाबत कंट्रोल रूमच्या अजय ढोक यांना फोनवर गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशिम
: वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शेत शिवारात पाल ठोकून राहत असलेल्या मेंढपाळ महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. याबाबत माहिती दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि आशा वर्कर यांनी पालावर येत याच ठिकाणी गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती केली. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून प्रसूतीनंतर आई आणि बाळाची प्रकृती चिंताजन असल्याने दोन किलोमीटर बैलगाडीतून आणून रुग्णवाहीकेद्वारे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

वाशीम जिल्ह्यातील इंझोरी शेत शिवारात काही मेंढपाळ उतरले आहेत. या मेंढपाळांमध्ये एक गर्भवती महिला होती. तिला काल सायंकाळच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. याबाबत कंट्रोल रूमच्या अजय ढोक यांना फोनवर गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. यानंतर अजय ढोक यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची एएनएम शारदा वेरूळकर यांना संपर्क साधला. 

पालावरच प्रसूती करण्याचा निर्णय 

दोघांनी घटनास्थळी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग केला. प्रवासा दरम्यान, रस्त्याच्या कठीण परिस्थितीमुळे त्यांना खूप अडचणी आल्या, परंतु त्यांचे धाडस कमी झाले नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर महिलेची प्रकृती लक्षात घेता पालावरच प्रसूती करण्याचा निर्णय घेत महिलेची सुरक्षित प्रसूती केली. यावेळी महिलेने एका गोंडस मुलीचा जन्म दिला. मात्र, बाळ आणि आईची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. तिथून १०२ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रसंगात अजय ढोक, शारदा वेरूळकर, डॉ. शेख आणि स्थानिक आशा वर्कर सुनिता राठोड यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता यामुळे एक महत्त्वाचा जीव वाचवण्यात यश आले. दरम्यान आरोग्य विभागाच्या या कार्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून डॉक्टर आणि आशा वर्कर यांच्या सेवाभावाला सलाम केला जात आहे. हा प्रसंग ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेचे जिवंत उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT