Cyber Crime : शेअर्समध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष; ५८ लाख रुपयांत फसवणूक

Navi Mumbai : तरुणांना नोकरीचे आमिष देत तर सोशल मीडियावरून एखादी लिंक पाठवून अँपच्या माध्यमातून बँकेतील रक्कम परस्पर काढून घेण्याचे प्रकार देखील घडले आहेत.
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात प्रामुख्याने नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानुसार नवी मुंबईमधील एका ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ५८ लाख रुपयात फसवणूक झाली आहे.  

ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक केली जात आहे. यात तरुणांना नोकरीचे आमिष देत तर सोशल मीडियावरून एखादी लिंक पाठवून अँपच्या माध्यमातून बँकेतील रक्कम परस्पर काढून घेण्याचे प्रकार देखील घडले आहेत. तर काही ठिकाणी पैशांची गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखविले जात असते. असाच प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. 

Cyber Crime
Cotton Price : बीडच्या माजलगावमध्ये १८ हजार ३८७ क्विंटल कापसाची खरेदी; साडेसात हजाराचा मिळतोय हमीभाव

शेअर मार्केटमधून नफ्याचे आमिष  

शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली एका जेष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. यातून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाकडून ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. अशा पद्धतीने तब्बल ५८ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

Cyber Crime
Primary School Time : राज्यात थंडीचा जोर वाढला; आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊला भरणार, कुणी दिला आदेश?

दरम्यान ज्येष्ठ नागरिकाने पैशांची मागणी केल्यानंतर त्यास उडवाउडवीचे उत्तर दिले. ५८ लाख ५ हजार रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यानुसार सायबर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com