Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : फाईलवर सहीसाठी महिला सरपंचाच्या पतीने स्वीकारली लाच; लाच लुचपत विभागाने घेतले ताब्यात

Washim News : १४ हजार रुपयांची मागणी गहूलीच्या सरपंच गोकर्ण विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू राठोड यांनी केली.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : महिला सरपंच असल्यास त्यांचे पती कारभार सांभाळत असतात. हा कारभार सांभाळताना (Bribe) फाईलवर सहीसाठी सरपंच पतीने लाभार्थीकडून १३ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना सरपंच पती लाचलुचपत विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला.  (Live Marathi News)

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गहुली येथे ही कारवाई झाली आहे. गहुली येथील सरपंच गौकर्नाबाई विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू मंगु राठोड अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुल मंजूर होते. या घरकुलाच्या फाईलवर सही करण्याकरिता ४ हजार रुपये तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांचे दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता १० हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपयांची मागणी गहूलीच्या सरपंच गोकर्ण विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू राठोड यांनी केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सरपंच पटीने तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. याचवेळी वाशिमच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने विष्णू राठोड यांना रंगेहाथ पकडत कारवाई केली. आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT