Washim News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Durga Mata Temple : शहापूर येथील दुर्गा माता मंदिरात चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला

Washim News : चोरट्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाभाऱ्यातील कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असतानाच मुख्य गेटचे कुलूप तोडण्याचा आवाज परिसरातील जय खोडे या युवकाने ऐकला.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: चोरट्यांकडून आता मंदिर देखील लक्ष केले जात आहेत. मंदिरातील दानपेट्या किंवा मुकुट चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत. अशातच वाशीम जिल्ह्यातील दुर्गा माता मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.  

वाशीमच्या शहापूर येथे प्रसिद्ध दुर्गा माता मंदिर आहे. या मंदिरात मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाभाऱ्यातील कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असतानाच मुख्य गेटचे कुलूप तोडण्याचा आवाज परिसरातील जय खोडे या युवकाने ऐकला. त्यांनी तत्काळ ही घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आणि लोकांना याबाबत माहिती देत सतर्क केले. 

दुचाकी सोडून झाले पसार 

दरम्यान घटनेची चाहूल लागताच मंदिरात नेहमी येणारे भक्त मंडळी जागी झाली. तर नागरिक परिसरातील नागरिक मंदिरात येत असल्याचे पाहून चोरट्यांनी घाबरून पळ काढला आणि आपल्या दुचाकी जागेवरच सोडल्या. पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि दुचाकी जप्त केल्या.

चांदीचा मुकुट गेला होता चोरीला 
तर दुर्गा माता मंदिरात देखील चोरीचा प्रकार घडला होता. दरम्यान यापूर्वी संस्थानमधील दुर्गा मातेचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. यानंतर पुन्हा चोरीचा प्रयत्न झाला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT