Washim Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident : वाशिम- हिंगोली महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू; ग्रामस्थांनी रोखून धरला महामार्ग

Washim News : वाशिम- हिंगोली महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. यात आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल
वाशिम
: वाशिम ते हिंगोली महामार्गावर तोंडगाव फाट्याजवळ सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये (Washim) एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात (Accident) घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केला. (Breaking Marathi News)

वाशिम- हिंगोली महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. यात आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तोंडगाव येथील लक्ष्मण परसराम गोटे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्ग मागील एक तासापासून रोखून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनीने केले अर्धवट काम 

महामार्गाच्या कामाचा ठेका घेतलेल्या मोंटो कॉर्लो कंपनीने वळणावर अर्धवट काम केले आहे. वळणावर मार्ग अर्धवट बनवल्यामुळे ह्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे महामार्गावर दगड लावून महामार्ग रोखला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

SCROLL FOR NEXT