Washim Accident News Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वर भीषण अपघात! जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव कार उलटली; एकाचा मृत्यू

Washim Accident News: जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी

Samruddhi Highway Accident:

जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ हा अपघात झाला. या घटनेत कार मधील एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ अपघात झाला. कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या. या घटनेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. सुनंदा अनुज दुरतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनुज दुरतकर (वय 65), पंकज अनुज दुरतकर (वय 35) भावना पंकज दुरतकर (वय 30) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात कार्ड लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण,डॉ. सोहेल खान घटनास्थळी दाखल झाले. तसेच डॉ. अडोळेंनी घटनास्थळी दाखल होत जखमीना घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. यातील गंभीर जखमींना श्रीगुरु मंदिर सेवक रमेश देशमुख हे पुढील उपचारासाठी अमरावती येथे घेऊन गेले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT