Crime News: प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून 2 किलो सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावरून दोघांना अटक

Gold Smuggling News: नागपूर विमानतळावरून दोन व्यक्ती सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती कस्टम विभागाला खबऱ्याकडून मिळाली होती
 Crime News custom department arrest two youths gold smuggling nagpur airport
Crime News custom department arrest two youths gold smuggling nagpur airportSaam TV
Published On

Nagpur Gold Smuggling News: सोने तस्करी करण्याचा अत्यंत धक्कादायक असा प्रकार नागपूर शहरातून समोर आला आहे. दोन तरुणांनी दुबई येथून आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये तब्बल २ किलो सोन्याची पेस्ट लवपून आणली होती. या तरुणांच्या हालचालींवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांची झाडझडती घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. (Latest Marathi News)

 Crime News custom department arrest two youths gold smuggling nagpur airport
Crime News: राज्यात महिला असुरक्षितच! ८ महिन्यातील अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक घटना

याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. शाहीद नालबंद आणि पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहे. दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

नागपूर विमानतळावरून दोन व्यक्ती सोन्याची तस्करी (Crime News) करणार असल्याची माहिती कस्टम विभागाला खबऱ्याकडून मिळाली होती. नागपूर विमानतळावर मंगळवारी पहाटे कस्टम विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते.

दरम्यान, कतारवरून आलेल्या विमानाने दोन तरुण नागपूरला आले. त्यांच्या हालचालींवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून व त्यांची अंगझडती घेतली. कस्टम विभागाने आरोपींची तपासणी देखील केली.

तपासणीदरम्यान आरोपीनी स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २ किलो सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दोन किलो सोनं जप्त केलं आहे. कस्टम विभागाच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Edited by - Satish Daud

 Crime News custom department arrest two youths gold smuggling nagpur airport
Astrology Today: ऋषिपंचमीच्या दिवशी या राशींचं भाग्य उजळणार; मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com