Maharashtra Women Crime News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)
गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील वर्तनाच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे.
मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या (Crime News) असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या ८ महिन्यांत नागपुरात ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.
सातत्याने महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असल्याने राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, अत्याचार पीडितांमध्ये शाळकरी तसेच महाविद्यालयीन तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये टवाळखोर तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. समाजात बदनामी होण्याची भीतीने बऱ्याच वेळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. अनेकदा विनयभंग/अश्लील वर्तनाचे गुन्हे दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचे काही घटनांतून समोर आले आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.