Washim News  Saam Tv
महाराष्ट्र

Washim : चेक चोरले नंतर ५ जणांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले ५ लाख , तहसील विभागातील धक्कादायक प्रकार

Washim News : वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील चेक चोरी प्रकरणात ५.५८ लाखांचा घोटाळा उघड झाला असून महसूल सेवकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • मालेगाव तहसील कार्यालयातून चेक चोरीचा प्रकार

  • ५.५८ लाख रुपये पाच खात्यांमध्ये ट्रान्सफर

  • महसूल सेवक केशव सरोदे याला अटक

  • पोलिस तपास सुरू असून आरोपी पीसीआरमध्ये

वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. चेक चोरी करून पाच जणांच्या अकाउंट मध्ये ५ लाख ५८ हजार रुपये जमा करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाइंड याच तहसील कार्यक्षेत्रातील किन्ही येथील महसूल सेवकच निघाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव तहसील कार्यालयाने १२ मार्चला तक्रार केली होती की, तहसील कार्यालयातून चेक चोरी करून ५ वेगवेगळ्या खात्यात ५ लाख ५८ हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. याप्रकरणी मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दहा दिवसानंतर या प्रकरणात किन्ही येथील महसूल सेवक केशव सरोदे याला अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण एकटा महसूल सहाय्यक करू शकत नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत अजून कोणी सहभागी असल्याची चर्चा मालेगाव मध्ये सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. चार दिवसानंतर चोरी झालेली चेकबुक तहसील कार्यालयाच्या नाझर विभागात अज्ञाताने आणून टाकले होते. त्या संदर्भात मात्र पोलिसांनी बोलण्यास टाळले. सध्या आरोपी पीसीआरमध्ये असल्याची माहिती मालेगाव पोलिसांनी दिली आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो मेकअप, नो फेशिअल! सकाळी उठून फक्त ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम; चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Maharashtra News Live Update: शिक्रापुरात पीएमपीएमएल बसची टेम्पोला जोरदार धडक

Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Jackfruit Seeds Vada Recipe : वटपौर्णिमेला खास बनवा खमंग-कुरकुरीत फणसाच्या बियांचे वडे, एकदा ट्राय करा ही कोकणी रेसिपी

Buldhana : बुलढाण्यात शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी एसटी बस जाळली

SCROLL FOR NEXT