नो मेकअप, नो फेशिअल! सकाळी उठून फक्त ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम; चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी घ्या

आजकाल सकाळी धावपळीमध्ये चेहऱ्याची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही अशावेळी आपण चेहऱ्यावर चमक येण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने, केमिकलयुक्त क्रिम्सचा वापर करतो मात्र यामुळे चेहऱ्याची वाट लागते.

Face Yoga Benefits For Glowing Skin

फेस योगा

चेहऱ्यावर मेकअप करण्याऐवजी जर तुम्हाला नैसर्गिक ग्लो हवा असेल, तर सकाळी उठल्या उठल्या 'फेस योगा' करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Natural Skin Glow Tips

सकाळी करा योगा

सकाळची वेळ ही शरीर आणि त्वचा या दोन्हींसाठी अत्यंत ऊर्जा देणारी मानली जाते. सकाळी उठून केवळ ५ ते १० मिनिटे चेहऱ्याचे सोपे व्यायाम केल्यास त्वचेचा रक्तपुरवठा सुधारतो चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करतो.

Anti-Aging Face Exercises

१) 'O' आणि 'E' पोझ

सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर सरळ बसा. प्रथम तोंड उघडून 'O' आकार करा आणि ५ सेकंद थांबा. त्यानंतर लगेचच तोंड पसरवून 'E' आकार करा. असं १० वेळा करा.

फायदा

या व्यायामामुळे चेहऱ्याचे सर्व स्नायू सक्रिय होतात आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.

'O' And 'E' Pose

२) माउथ पफ व्यायाम

गालांमध्ये हवा धरून ठेवा म्हणजेच गाल फुगवून ही हवा ५ ते १० सेकंद रोखून धरा आणि नंतर हळूहळू तोंडावाटे सोडा.

फायदा

या व्यायामामुळे गालांचे स्नायू टोन होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि गाल निरोगी व टवटवीत दिसतात.

The Mouth Puff / Balloon Pose

३) डिटॉक्स ब्रीदिंग

सकाळी मोकळ्या हवेत किंवा खिडकीजवळ बसा. डोळे बंद करून नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंद रोखल्यानंतर तो तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडा.

फायदा

या व्यायामामुळे शरीरातील आणि त्वचेतील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होतो.

Detox Breathing Exercise

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जिमला जायची गरज नाही! हे 5 व्यायाम केल्याने मांड्यांवरची चरबी होईल कमी

येथे क्लिक करा..