Manasvi Choudhary
आजकालच्या बैठी जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेकांचे वजन वाढते. वजन वाढले की त्याचा सर्वात पहिला परिणाम पोटावर आणि मांड्यांवर दिसतो.
मांड्यांवर साचलेली चरबी कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात. मात्र आज आम्ही तुम्हाल घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने व्यायाम केल्याने मांड्यांवरची चरबी कशी कमी करू शकता हे सांगणार आहोत.
१) स्टेप अप्स करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मजबूत खुर्ची किंवा जिन्याची पायरीचा सपोर्ट घ्यावा लागणार आहे.
२) एक पाय पायरीवर ठेवा आणि टाचेवर जोर देऊन शरीर वर उचला.
३) दुसरा पाय वर आणा आणि मग हळूहळू खाली उतरा.
४) प्रत्येक पायाने १२ वेळा असं केल्याने तुम्हाला फरक दिसेल
१) एका कुशीवर पाय एकमेकांवर ठेवून सरळ झोपा.
२) आता वरचा पाय हळूहळू वर उचला आणि एका सेकंदासाठी हवेतच ठेवा नंतर पाय मूळस्थितीत ठेवा.
३) प्रत्येक बाजूला १५ वेळा असा व्यायाम करा.
१) भिंतीला पाठ टेकवून उभे राहा आणि गुडघे ९० अंशात वाकेपर्यंत खाली सरका
२) या स्थितीत १० ते १५ मिनिटे राहा म्हणजे पायांच्या स्नायूंचा व्यायाम होईल.
१) एका पायाने पुढे मोठे पाऊल टाका. दोन्ही
२) नंतर पुढच्या टाचेवर जोर देऊन पुन्हा मूळ स्थितीत वर या.
३) प्रत्येक पायाने १०-१२ वेळा आलटून पालटून करा.
१) खांद्याच्या रुंदीइतके पाय लांब ठेवून उभे रहा.
२) खुर्चीवर बसल्याप्रमाणे खाली वाका, पण हे करताना घाई करू नका.
३) खाली वाकल्यावर एक सेकंद थांबा आणि मग हळूहळू वर या
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.