Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधून एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होत असते, ज्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतो.
आजकाल प्रत्येकांकडे फोन असतो. फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे.
पण तुम्हाला माहितीये का? वास्तूशास्त्रानुसार, केवळ घरातील वस्तूच नाही, तर तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये असणारे काही फोटो देखील तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करू शकतात.
वास्तूशास्त्रानुसार, फोनच्या गॅलरीतील कोणते फोटो नकारात्मकता वाढवतात.फोनमध्ये कोणते फोटो ठेवू नये हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
गॅलरीमध्ये कधीही तुटलेली भांडी, तडे गेलेली काच किंवा तुटलेल्या वास्तूंचे फोटो ठेवू नका.
फोनच्या गॅलरीमध्ये उदास, रडणाऱ्या किंवा अत्यंत दुःखी असलेल्या लोकांचे फोटो ठेवणे टाळा.
फोनमध्ये मारामारी, हिंसाचार किंवा धारदार शस्त्रास्त्रांचे (Weapons) फोटो ठेवू नयेत. अनेकदा संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपण जुन्या तलवारी किंवा शस्त्रांचे फोटो काढतो, परंतु वास्तूशास्त्रानुसार असे फोटो फोनमध्ये ठेवू नका.
गॅलरीमध्ये सुकलेली झाडे, पाने फोटो ठेवणे अशुभ मानले जाते.
अनेकदा लोक भूतकाळात घडलेल्या एखाद्या अपघाताचे, आजारपणाचे किंवा वाईट प्रसंगाचे फोटो आठवण म्हणून फोनमध्ये साठवून ठेवतात. मात्र, या जुन्या आठवणीचे फोटो फोनमध्ये ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.