Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Shreya Maskar

नाशिक

मांगी-तुंगी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले दुहेरी शिखरांचे पर्वत आणि जैन तीर्थक्षेत्र आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंग करावी लागते.

Nashik | google

मांगी-तुंगी

मांगी-तुंगी पर्वताच्या पायथ्याशी 'भिलावाडी' हे गाव आहे. या परिसरात अनेक प्राचीन किल्ले, धरणे आणि मंदिरे आहेत. मांगी-तुंगी येथे मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक शिलालेखही आढळतात.

Mangi-Tungi | google

निसर्ग सौंदर्य

मांगी-तुंगी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आहे. प्राचीन काळातील पाषाणात कोरलेल्या गुहा आणि निसर्गाची विहंगम दृश्ये यांचा सुरेख संगम येथे पाहायला मिळतो.

Beauty of nature | google

तीर्थक्षेत्र

मांगी-तुंगी हे प्रामुख्याने भगवान ऋषभनाथ यांना समर्पित आहे. येथे जगातील सर्वात उंच जैन मूर्ती १०८ फूट उंचीची 'अहिंसा मूर्ती' आहे. हे ठिकाण पवित्र 'सिद्ध क्षेत्र' तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.

A place of pilgrimage | google

उंची किती?

मांगी-तुंगी येथे ३,५०० हून अधिक पाषाण-निर्मित पायऱ्या आहेत. या ठिकाणाला 'महाराष्ट्राची ग्रेट वॉल' म्हणूनही ओळखले जाते.

height | google

नाशिकमधील पर्यटन स्थळे

नाशिकजवळ दुगरवाडी धबधबा, सोमेश्वर धबधबा, गंगापूर धरण, वैतरणा धरण, अंजनेरी हिल्स, इगतपुरी ही पर्यटन स्थळे आहेत.

Tourist Places in Nashik | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव! खूप कमी लोकांना माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांचा 'हा' किल्ला

Sindhudurg Fort | saam tv
येथे क्लिक करा...