Washim New saam tv
महाराष्ट्र

Washim : कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर अरेरावी, मोबाईलही हिसकावून घेतला

Washim New : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवर अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने एका शेतकऱ्याचा मोबाईल देखील हिसकावून घेतला.

Yash Shirke

  • कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वाशिम जिल्ह्यात खळबळजनक प्रकार

  • कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याने केली शेतकऱ्यांवर अरेरावी

  • अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याला मोबाईल हिसकावून घेतल्याचे उघड

मनोज जयस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विभागातील महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अरेरावी झाली आहे. या महिलेने एका शेतकऱ्याचा मोबाईल देखील हिसकावून घेतला. शेतकऱ्यांवर अरेरावी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना कृषीमंत्र्यांच्या वाशिम जिल्ह्यामध्ये घडली आहे.

नुकतेच कृषिमंत्री झालेले दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवर अरेरावी केली. वाशिमच्या आत्मा विभागाच्या अंतर्गत शाश्वत शेती दिनाच्या निमित्ताने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

शाश्वत शेती दिनी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना जेवण अपुरे पडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा आत्मा विभागाच्या संचालिका असलेल्या अनिसा महाबळे या शेतकऱ्यांवर भडकल्या. कार्यक्रमात सामील झालेला एक शेतकरी तरुण या संपूर्ण घटनेचे त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण करत होता.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अनिसा महाबळे यांनी शेतकऱ्याचा मोबाईल फोन देखील हिसकावून घेतला. मात्र आता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत महाबळे यांच्याकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे. कृषिमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच जिल्ह्यात अशी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोळी बांधवांना चांगले मासे मिळू दे! खासदार रवींद्र वायकर यांचं समुद्राला साकडं

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT