Sangli Crime : खिशातून पैसे काढले, दारुच्या नशेत तरुणाने डोक्यात दगड घालून केला जिवलग मित्राचा खून

Sangli Crime News : सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला आहे. मित्राला ठार केल्यानंतर आरोपी तरुण पोलीस ठाण्यात हजर झाला.
Sangli Crime
Sangli Crimex
Published On
Summary
  • सांगलीमधील भयंकर घटना उघडकीस आली आहे.

  • एका तरुणाने त्याच्या जिवलग मित्राचा खून केला.

  • दारुच्या नशेत मित्राच्या डोक्यात तरुणाने दगड घातला.

  • या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sangli : दारुच्या नशेत एकाने डोक्यात दगड घालून त्याच्या मित्राचा खून केला. खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या कारणावरुन मित्रांमध्ये वाद झाला. यातून आरोपीने त्याच्या मित्राला ठार केल्याचे म्हटले जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळाला आणि स्वत:हून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. ही घटना सांगलीमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुर साठे (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव प्रताप चव्हाण (वय २४ वर्षे) आहे. मयुर हा वॉचमन म्हणून काम करतो. तो मीरज तालुक्यातील सोनि या गावामध्ये कुटुंबासह राहत होता. मयुर साठे आणि प्रताप चव्हाण हे दोघे लहानपणापासून मित्र होते, त्या दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते.

Sangli Crime
Pune Crime : पुण्यात खळबळ! वडील चिडले म्हणून १६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

बुधवारी (६ ऑगस्ट) मयुर आणि प्रताप दोघांनी दिवसभर सोबत हॉटेलमध्ये जोरदार पार्टी केली. ते दोघे प्रचंड दारु प्यायले. यादरम्यान मयुरने आरोपी प्रतापच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागातून आरोपीने बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतीतील महावितरण कार्यालयाच्या बाजूला डोक्यात दगड घालून मयुरची हत्या केली.

Sangli Crime
Actor Shot Dead : लोकप्रिय अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या, पीडित महिलेच्या मदतीसाठी गेल्यानं गमावला जीव

मयुरला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचे दिसताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. तो स्वत:हून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करुन आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Sangli Crime
Pune Crime : विकृतीचा कळस! पुण्यात तरुणाकडून मादी श्वानावर अत्याचार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com