Washim Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Washim Crime News : अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार, तीन नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Washim Crime : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात एका १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनही नराधमांची कारागृहात रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी 21 ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर तिघांवर रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय अहवालातात लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीनही नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने तीनही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मुंगसाजी नगर येथील आरोपी पंढरी फुफाटेने तिला उचलून जवळच असलेल्या टेकडीवरच्या झोपडीत नेले. त्यांच्या मागोमाग गणेश फुफाटे आणि सूर्यभान फुफाटे हे सुद्धा तिथे पोहचले. यावेळी आरोपी पंढरी फुफाटे याने पीडित मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला. आणि कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT