Washim Crime Husband attacks wife and two children saam tv
महाराष्ट्र

Washim Crime News: पतीचा बायकोसह दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, थोड्याशा जमिनीसाठी पोटच्या पोराला संपवलं

Chandrakant Jagtap

>> मनोज जैस्वाल, साम टीव्ही

Husband Attacks Wife And Two Children: वाशिममध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला, तर मोठया मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हरिओम घोडके असे मृत मुलाचे नाव आहे असून नंदू घोडके असे आरोपीचे नाव आहे. मंगरूळपिर तालुक्यातील ईचोरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, आरोपीच्या भावाने मोठ्या मुलाच्या नावावर शेती केली होती. यानंतर आरोपीने शेती मुलाच्या नावावर का केली असे म्हणत वाद घातला आणि रात्री पत्नी रेखा घोडकेसह हरी ओम आणि महादेव या दोन्ही मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

या हल्ल्यात रेखा घोडके आणि दोन्ही मुलं गंभीर जखमी झाले. मोठा मुलगा हरिओम अधिक गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी अकोला पाठवण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. रेखा घोडके आणि छोटा मुलगा महादेव घोडके यांच्यावर वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Breaking News)

पोलिस तपासात आरोपी नंदू आत्माराम घोडके हा नेहमी वाद घालत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी नंदू आत्माराम घोडके हा फरार झाला असून असेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT