Running Truck Fire: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! धावत्या ट्रकला लागली आग

Nandurbar Latest News: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! धावत्या ट्रकला लागली आग
Nandurbar Running Truck Fire
Nandurbar Running Truck FireSaam Tv

>> सागर निकवाडे

Nandurbar Latest News: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या धावत्या ट्रकने क्षणातच पेट घेतला. सुरूवातीला ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. नंतर ही आग पसरत संपूर्ण ट्रकला लागली. ही आग ट्रक क्रमांक के.ए 01 ए.जे 8799 गांधीधामहून कर्नाटककडे जात असताना लागली. ट्रकमध्ये पावडर भरले होते. ट्रकच्या केबिन मधील आग हवेच्या वेगाने मागेपर्यंत पसरत गेल्याने क्षणातच संपूर्ण ट्रक जळू लागला.

Nandurbar Running Truck Fire
Simple One Electric Scooter: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! सिंपल एनर्जीच्या नवीन EV ची डिलिव्हरी सुरू, जाणून घ्या किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निमदर्डा फाट्यानजीक शेरटान हाॅटेल जवळ ही घटना घडली. आग लागल्याबरोबर आजूबाजूचे नागरिक आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. (Latest Marathi News)

परंतु आगीचा वेग जास्त असल्याने आग नियंत्रणात न येता संपूर्ण ट्रक जळू लागला. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ज्वलनशील टँकर, गॅस टँकर यांना या मार्गावरून जाण्यास महामार्ग पोलिसांनी काही वेळ बंदी घातली होती.

Nandurbar Running Truck Fire
MSP for Kharif Crops : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ!

आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली. चालक व सहचालक आग लागताच ट्रकच्या बाहेर निघून गेले होते. दरम्यान, आग विझवण्यासाठी जवळपास अग्निशामक बंब नसल्याने विसरवाडी परिसरातील ग्रामस्थांची धावपळ झाली होती. आगीत मोठे नुकसान होते त्यामुळे विसरवाडी ग्रामपंचायतमध्ये अग्निशामक बंब असणे गरजेचे आहे. ट्रक मधील आग विझवण्यासाठी ठोस उपाय योजना न झाल्याने ट्रक आगीत जळून खाक झाला. पोलिसांनी यासाठी प्रयत्न केला परंतु ते देखील अपयशी झाल्याचे दिसून आले. यातच ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास विसरवाडी पोलीस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com