maharashtra rain update, washim, gadchiroli, thane, rain, flood saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! वाचा कूठं काय घडलं

नागरिकांनी आवश्यकता असेल तर घरा बाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संजय तुमराम, गजानन भोयर, संजय जाधव, विकास काटे

सातारा : राज्यभरात गेल्या दाेन दिवसांत पावासानं (Rain) पुन्हा एकदा जाेरदार हजेर लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच काेकणातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. वाशिम, गडचिराेली, बुलढाणा येथील काही गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यात एक युवक वाहून गेला आहे तर ठाण्यात एका साेसायटीची भिंत काेसळली आहे. दरम्यान नागरिकांनी आवश्यकता असेल तर घरा बाहेर पडा असं आवाहन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा आदी जिल्ह्यातील प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Rain Update)

वाशिम तोंडगावचा संपर्क तुटला

वाशिम (Washim Rain) जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. वाशिम तालुक्यातील तोंडगाव गावाला लागून असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. या पुरामुळे वाशिम तोंडगावचा संपर्क तुटला आहे.

शेतीचं माेठं नुकसान

वाशिम जिल्ह्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पावसाने उसंत घेतली नाही तर यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, खरिपातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने अशा पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पुलाची उंची कधी वाढविणार ?

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव ते पांघरी नवघरे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान पांघरी येथील नागरिकांना हा एकमेव पूल असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून पुलावर येजा करावी लागत आहे.

दरम्यान यापुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित विभाग इकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं आता तरी मागणीकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.

येळगाव धरण शंभर टक्के भरलं

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्य जलस्रोत येळगाव धरणं हे आज पूर्ण क्षमतेने भरलं. आज या धरणातील पाण्याचं जलपूजन बुलढान्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सपत्नीक केलं. येळगाव धरणं शंभर टक्के भरल्याने आता बुलढाणेकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. (Buldhana Rain Update)

आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज पाण्याचा जोर वाढल्याने मंगरूळपीर-अनसींग रस्त्यावर भोंगळ नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला. दरम्यान काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

भामरागडचा संपर्क तुटला

गडचिरोली (Gadchiroli Rain) जिल्ह्यातील भामरागडचा संपर्क पुन्हा एकदा तुटला. सकाळच्या सुमारास संपर्क तुटल्याने नागरिकांच्या प्रवासाची अडचण झाली. दरम्यान लगतची पर्लकोटा नदी ओसंडून वाहत आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे पाणी वाढतच आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भामरागडचा संपर्क तुटल्याने या तालुक्यातील शंभरावर गावेही संपर्कहीन झाली आहेत.

वागळे इस्टेट परिसरातील सोसायटीची भिंत काेसळली

ठाणे शहरात पडणाऱ्या पावसामुळे वागळे इस्टेट परिसरातील सोसायटीची वीस फूट लांब आणि (80 फूट) उंच भिंत कोसळली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळवरील ढिगारा बाजूला केला आहे.

युवकाचा शाेध सुरु

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात काल रात्री पासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रवाडा या गावातील अंकुश महादेवराव धुर्वे हा युवक वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक त्याचा शाेध घेत आहे. (Amravati Rain)

श्रीवर्धनच्या रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबले

रायगडमधील प्रसिद्ध समुद्र किनारा असलेल्या श्रीवर्धनला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे येथील नदी नाले वाहत आहेत. श्रीवर्धन शहरात सखल भागातील रस्त्यावर पुराचे पाणी साचले आहे. श्रीवर्धन शहरातील सी शोअर रस्ता आणि राऊत शाळा या भागात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी आणि वाहन चालकांना या साचलेल्या पाण्यातुन मार्ग काढत जाण्याची वेळ आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT