सांगली/ सातारा : गेल्या दाेन पासून सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. यामुळे दाेन्ही जिल्ह्यातील प्रमुख धरणांत पाणी साठा वाढला आहे. याबराेबरच नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहे. राखी पाेर्णिमा (rakhi purnima) , स्वातंत्र्य दिन या निमित्त बाजारपेठ सजली आहे परंतु सततच्या पावसामुळे बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम हाेत आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे सातारा (Satara) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain Update)
सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात मागील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला.
आज वारणा धरणात (28.78 TMC) टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असून धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणातील पाणी पातळी निश्चित ठेवण्याकरिता धरणातून केव्हाही नदीपात्रात दोन हजार ते चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना दक्षतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.
मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्प
सातारा जिल्ह्यातील मोरणा धरणात सध्या ७६.१० टक्के पाणी साठा असून सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. मोरणा धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (साेमवार) दुपारी दाेन वाजले पासून सांडव्यामधून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
मोरणा नदी काठावरील लोकांनी नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये. पर्जन्यमान वाढल्यास सांडव्याद्वारे विसर्गात वाढ होऊ शकते असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.