Washim News Saamtv
महाराष्ट्र

Washim News: टँकरची पाईप फुटली अन् लोक तुटून पडले, खाद्यतेल पळवण्यासाठी नागरिक डबे, पातेले घेऊन रस्त्यावर; नेमकं काय घडलं?

Washim News: वाशिम शहरातील (Washim) दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते. मात्र खाद्यतेल टँकर खाली करत असतांना अचानक टँकरमधील कॉकचा पाईप फुटला.

Gangappa Pujari

मनोज जयस्वाल, वाशिम|ता. १६ जानेवारी २०२४

Washim Breaking News:

वाशीम शहरातील पाटणी चौकात खाद्य तेलाच्या टँकरच्या कॉकचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल वाहू लागल्याचा प्रकार घडला. रस्त्यावर पाण्यासारखे वाहणारे तेल पाहून नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली. यामध्ये दुकान मालकाचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे. (Maharashtra Latest News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम शहरातील (Washim) दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते. मात्र खाद्यतेल टँकर खाली करत असतांना अचानक टँकरमधील कॉकचा पाईप फुटला.

ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत पाईपमधून जवळपास 600 लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले. खाद्यतेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत होते. वाहत असलेले तेल पाहताच उपस्थित असलेल्या पुरुष, महिला आणि लहान मुलांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या गर्दीमुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच त्या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्य तेलाचे एकूण 60 हजार रूपयाचे नुकसान झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT