Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती; मुंबईत धडकण्याआधीच आरक्षणावर तोडगा निघणार?

Maratha Aarkshan: आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १६ जानेवारी २०२४

Manoj jarange Patil:

येत्या काही दिवसात मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असून या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. अशातच आता राज्य सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन मुंबईमध्ये धडकणार आहे. मात्र मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार असूनराज्य सरकारकडून जरंगे यांची समजूत काढण्यासठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लक्ष ठेऊन आहेत, त्यामुळे मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, मराठा आरक्षणावर राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार असल्याचीही माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Maharashtra Politics: ब्रेकिंग! महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवणार?

सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला...

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे.

या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे. सरकारचा नवा ड्राफ्ट घेऊन दोघेही छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Sanjay Raut News: 'दरोड्याची पोलखोल करणार...' महा पत्रकार परिषदेआधी राऊतांचा हल्लाबोल; CM शिंदे, नार्वेकरांना थेट आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com