Chandrapur News : पतंगचा माेह... भानापेठेत घराच्या छतावरून पडून एकाचा मृत्यू; नागपूरात नागरिकांसह पक्षी जखमी

नागपूरात नायलॉन मांजामुळे 15 नागरिकांसह पशू पक्षी देखील जखमी झाले.
citizen from chandrapur passed away while flying kite
citizen from chandrapur passed away while flying kitesaam tv
Published On

- संजय तुमराम / पराग ढाेबळे

Chandrapur News :

मकर संक्रांत (makar sankranti 2024) निमित्त राज्यभरात युवा वर्गात पतंग उडविण्याचा उत्साह दिसून आला. पतंगाेत्सवात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात काही दुर्देवी घटना घडल्या. चंद्रपूर येथे पतंग पकडण्याच्या माेहात एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर नागपूरात पक्ष्यांना मांज्यामुळे इजा झाली. (Maharashtra News)

चंद्रपूर येथे भानापेठ वॉर्ड येथे पतंग उडवण्याचा उत्साह जीवावर बेतला. आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर हाेते. त्यांना एक पतंग कटलेली दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद हे पुढे सरकले. मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

citizen from chandrapur passed away while flying kite
Swabhimani Shetkari Sanghatana: आम्हाला एका पाॅकेटपुरती चळवळ उभी करायची नाही : रविकांत तुपकर; राजू शेट्टींनी सवयीप्रमाणे...

पतंगबाजीमुळे पक्ष्यांवर संक्रांत

नागपूर शहरातील विविध भागात प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे (nylon manja) 15 नागरिकांसह पशू पक्षी देखील जखमी झाल्याच्या घटना समाेर आल्या. काही जखमी पक्ष्यांवर नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये उपचार केले जात आहे. यामध्ये कबुतर, गरुड सारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्याने ५ पेक्षा अधिक पक्ष्यांचा जीव वाचविण्यात यश आल्याची माहिती पक्षीप्रेमींनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

citizen from chandrapur passed away while flying kite
Buldhana News : बुलढाण्यात उपक्रम, कारसेवक वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com