Wardha News  
महाराष्ट्र

पतीचा राग असह्य; पत्नीने दीड वर्षाच्या मुलींसह आयुष्य संपवलं, वर्धा हादरलं

Wardha News : पत्नीचा राग आल्यामुळे विहिरीत उडी घेऊन माय लेकीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामध्ये घडली. हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथे ही घटना घडली. याप्रकरणी वडनेर पोलिसात गुन्हा दखल कऱण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

चेतन व्यास, वर्धा प्रतिनिधी

Wardha Local News Update : शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत लगतच्या शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात घडली. शशिकला पिंटू घुले (२४ रा. परसोडी जि. यवतमाळ), कविता पिंटू घुले (१.५) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील घुले कुटुंब असून ते फुकटा गावात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते. त्यांचा मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय आहे. मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडणे होते. मात्र, मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे गेल्याने पिंटूने पत्नी शशिकलाला मेंढ्यांना आणण्यास सांगितले. मात्र, शशिकलाने जाण्यास नकार दिला असता पिंटूने पत्नीच्या कानशिलात लगावत मेंढ्या आणण्यास सांगितले. शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली. मात्र, तिने पतीच्या रागावर वरघणे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत मुलीसह उडी मारुन आत्महत्या केली.

विहिरीत उडी मारताना तेथील काही नागरिकांना ही बाब दिसली. त्यांनी तत्काळ इतरांना गोळा करत माय लेकीला विहिरीबाहेर काढले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. मृत विवाहितेच्या घरातील नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपासाला सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT