Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wedding Invitation card : आगळीवेगळी लग्न पत्रिका..सोबत आले सीड बॉल; लग्न पत्रिकेतून पर्यवरणाचा संदेश

Wardha News : लग्न सोहळा करताना हौसेला मोल नाही, असे म्हणत लग्नात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न असतो लग्न सोहळ्यात वेगळेपण पाहण्यास मिळते हिंगणघाट येथील लकी खिलोसिया या तरुणाने पर्यावरणाचा संदेश दिला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: शहर, गावांचा विस्तार होत असताना मोठ्या झाडांची कत्तल केली जातं आहे. जेवढी वनसंपदा तोडली जातं आहे, त्या प्रमाणात वृक्षाची लागवड होत नाही. काहीजण यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यानुसार हिंगणघाट येथील लकी खिलोसिया या युवकाने आपल्या लग्नाची पर्यावरण पूरक पत्रिका छापली. या पत्रिकेतून नागरिकांना पर्यावरणच्या संदेश सोबत वृक्ष लागवडीची प्रेरणाही देत आहे. लग्न पत्रिका देताना पत्रिकेसोबत एक सीड बॉलही गिफ्ट दिला जात आहे. तर पत्रिकाही पर्यावरणाला साथ देणारी असल्याने सहजीवनात पदार्पण सृष्टीला नमन करीत असेच म्हणावे लागेल. 

लग्न सोहळा करताना हौसेला मोल नाही, असे म्हणत लग्नात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न असतो. काहीजण लग्न सोहळ्यात वेगळेपण पाहण्यास मिळते. मात्र हिंगणघाट येथील लकी खिलोसिया या तरुणाने पर्यावरणाचा संदेश दिला आहे. लकी हा पर्यावरण, वृक्षारोपण, व शिक्षण या क्षेत्रासाठी संवेदनशील. आपलं जीवन समर्पित करणाऱ्या युवकाच्या स्वतःच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही तशीच अफलातून छापली आहे. 

काडी कचऱ्यापासून बनविली पत्रिका 

विवाह पत्रिका ज्या आर्ट पेपरवर छापलेली आहे; तो कागद हा ग्राम आर्ट प्रोजेटद्वारा तयार करण्यात आलेला आहे. ती संस्था नागपूर जिल्ह्यातील माता अनुसया यांच्या पारडसिंगा या गावातील. शेतातील काडीकचऱ्याच्या माध्यमातून जवळपास ३०० महिलांना रोजगार देणारी ही संस्था आहे. पत्रिका ग्रामीण महिलांनी आपल्या हातानी खराब कागद, शेतातील कचरा व अन्य वस्तू सडवून त्यापासून कागद तयार करून तयार केली आहे. लग्न पत्रिकेसोबत एक सीड बॉल आहे. तो कागदाने तयार केलेला असून त्याच्या आत अगस्ती वृक्षाचे बी आहे. बी अंगणात किंवा मोकळ्या जागेवर लावता येऊ शकते. झाडाचे फूल हे भाजी व अन्य जीवनावश्यक वस्तूसोबत खाता येत. 

पर्यावरणाविषयी जनजागृती 

भारतीय संस्कृतीत वृक्षसंवर्धनाचा विचार झालेला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, मानवाच्या हस्तक्षेपाने ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन रोखण्याची आज नितांत गरज आहे या उदात्त हेतूने लकी खिलोसिया या तरुणाने खारीचा वाटा म्हणून पर्यावरण पूरक लग्नपत्रिका तयार करून प्रत्यक्ष कृतीने एक आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. त्यामुळेच स्वतःच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही त्याच्या आजवरच्या या जीवनदृष्टीला शोभेसी. बोले तैसा चाले या उद्देशाने प्रेरित झालेल्या लकीने परिणय एवं पर्यावरणाचा हा उत्सव साजरा करण्याचा मानस निश्चित समाजात एक पर्यावरणाविषयी जन जागृती करणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT