Wardha Accident News Saam TV
महाराष्ट्र

Wardha Accident News: साडीचा पदर बाइकच्या चेनमध्ये अडकून मायलेकी रस्त्यावर पडल्या, पाठीमागून टँकर आल्यानं अनर्थ घडला

Wardha Accident News: वर्धा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. नातेवाईकाच्या लग्नाला दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Accident News: वर्धा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. नातेवाईकाच्या लग्नाला दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चेनमध्ये अडकला, काही कळण्याच्या महिला आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसह रस्त्यावर कोसळली.

त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दोघींनाही चिरडले. या घटनेत माय-लेकींचा दुर्देवी अंत झाला. सुदैवाने वडील आणि दोन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली. काळजाचा ठोका चुकणारा हा अपघात बाजारवाडा फाटा परिसरात झाला. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निलिमा राजकुमार सयाम (२७), तनुष्का राजकुमार सयाम अशी मृतकांची नावे आहे. तर राजकुमार नामदेव सयाम (२७) व दीड वर्षीय मुलगी रियांशी ही किरकोळ जखमी झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विरुळ (Wardha News) येथील रहिवाशी असलेले राजकुमार आणि मृत निलिमा हे आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन नेरपिंगळाई येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाले होते. दरम्यान बाजारवाडा फाट्याजवळ निलिमा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चेनमध्ये अडकला.

काही कळण्याच्या आतच निलिमा चिमुकल्या मुलीसह दुचाकीवरून रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात टँकर आला. टँकरच्या मागील चाकाखाली (Accident) येऊन दोघीही चिरडल्या गेल्या. तसेच राजकुमार आणि त्याच्याजवळ समोर बसलेली मुलगी जखमी झाली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पत्नी आणि पोटच्या मुलीचा डोळ्यादेखत जीव गेल्याने राजकुमार यांनी हंबरडा फोडला. त्यांना किरकोळ मार लागला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राजकुमार सयाम हे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहे. त्यांचा २७ रोजी वाढदिवस होता. मात्र, जन्मदिनीच त्याच्या कुटुंबावर काळाने झडप घेतली आणि पत्नी व दीड वर्षीय मुलीने जग सोडले. ही घटना मनाला चटका लावून गेली. या घटनेने विरुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT