Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Wardha News : भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरुन हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात होते. दरम्यान कांढळी ते बरबडी रस्त्यावर कांढळी शिवारात ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरुन मुजफ्फरनगर येथे जात असलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप पूर्णतः जळून खाक झाले असून महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. 

ट्रक चालक जसवंत सिंग त्रिलोक सिंग (वय ४५ रा. मेरठ उत्तरप्रदेश) आणि सहचालक भोपाळ दाताराम (वय ६०) हे दोघे ट्रकमध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरुन हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात होते. (Wardha) दरम्यान कांढळी ते बरबडी रस्त्यावर कांढळी शिवारात ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. दरम्यान ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप जळून खाक झाले. याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली.

सदर घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस आणि हिंगणघाट पोलिसांनी धाव घेतली. आगीची घटना घडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान महामार्ग पोलिसांच्या सेफ्टी टिमने तसेच आग विझविल्यानंतर हायड्राच्या मदतीने जळलेला ट्रक रस्त्याकडेला हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. नोटांचा अंश असलेले काही कागद अर्धवट जळाले. जळालेल्या कागदांमध्ये नोटांचे स्क्रॅप असल्याने नागरिकांना हा ट्रक नोटांनी भरला असल्याचा संशय आला आणि त्यांनी विविध समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल करुन नोटा भरलेल्या ट्रकला आग लागल्याचे दाखविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT