Wardha Saam
महाराष्ट्र

सायंकाळी उठला अन् घरासमोरील नाल्यात पडला; ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

Wardha Shock: वर्ध्यात ३ वर्षीय डुग्गु पंकज मोहदुरेचा नाल्यात पडून मृत्यू. जोरदार पावसामुळे नाल्यांचा प्रवाह वाढून दुर्घटना घडली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

Bhagyashree Kamble

  • वर्ध्यात नालीच्या पाण्यात चिमुकला गेला वाहून

  • खेळत असताना घरासमोरील नालीत पडला.

  • तीन वर्षीय डुग्गु पंकज मोहदूरे या चिमुकल्याचा मृत्यू.

  • वर्धेच्या गणेश नगर येथील घटना.

वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोरील नाल्यात पडून एका ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय बालक सायंकाळी उठला. नंतर घराबाहेर जात असताना नालीत पडला. चिमुकला अवघ्या तीन सेकंदात नालीच्या प्रवाहान वाहून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चिमुकल्याचा नालीत वाहून गेल्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वर्ध्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय. सततच्या पावसामुळे गावातील नाल्याही ओसंडून वाहत आहे. अशातच गावातील एका बालकाचा नाल्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. डुग्गु पंकज मोहदुरे असे तीन वर्षीय बालकाचे नाव आहे. तो वर्ध्याच्या गणेश नगर येथील रहिवासी आहे.

सायंकाळी झोपेतून उठून तो बाहेर गेला. मोहदुरे यांच्या घराबाहेर एक मोठी नाली आहे. सायंकाळी झोपेतून उठून डुग्गु घराबाहेर पडला. अचानक तोल गेला आणि चिमुकला नाल्यात पडला. ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलगा अवघ्या तीन सेकंदात नालीच्या प्रवाहात वाहून गेल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यामातून निदर्शनास आले आहे.

चिमुकला वाहून जात असताना घराजवळ कुणीही उपस्थित नव्हते. तब्बल अर्धा किलोमीटर चिमुकला वाहून गेला. मुलगा अचानक गायब झाल्याने त्याचा शोध सुरू झाला. कुणी अपहरण केल्याचा संशय कुटुबियांनी व्यक्त केला. पण नंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चिमुकला नाल्यात वाहून गेल्याचे समोर आले. यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज ठाकरेंनंतर भाजप नेत्याचा आयोगावर गंभीर आरोप; थेट निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडावर व्यावसायिक अतिक्रमण ?

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

SCROLL FOR NEXT