Wardha News Saamtv
महाराष्ट्र

Wardha News: पिकविम्याच्या तक्रारी करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचण दूर करा, आमदार रणजित कांबळेंचे निर्देश; प्रशासन अलर्ट

Wardha News: आमदार रणजित कांबळे (Ranjit Kamble) यांनी पत्र लिहत जिल्हाधिकारी यांना निर्देश देताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पीकविमा बाबत ऑनलाईन पद्धतीत अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या पीक विमा कार्यालयात अथवा प्रतिनिधीना वैयक्तिक अर्ज देण्याचे आदेश दिले आहेत.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता.११ फेब्रुवारी २०२४

Wardha News:

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हरभरा, गहू, तूर, कापूस यासह भाजीपाला पिके जमिनदोस्त झाली. नुकसानीबाबत शेतकरी पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर व टोल फ्री नंबरवर 72 तासांच्या आत तक्रार करावयाची आहे. मात्र यात तांत्रिक अडचण येत असल्याच समोर आले आहे. याबाबत आमदार रणजित कांबळे यांनी पत्र लिहत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

आमदार रणजित कांबळे (Ranjit Kamble) यांनी पत्र लिहत जिल्हाधिकारी यांना निर्देश देताच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पीकविमा बाबत ऑनलाईन पद्धतीत अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या पीक विमा कार्यालयात अथवा प्रतिनिधीना वैयक्तिक अर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांच्या पुढाकारणे शेतकऱ्यांना होत असलेली अडचण तातडीने दूर झाली.

सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे देखील नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तत्काळ पाठवून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुद्धा आमदार रणजित कांबळे यांनी केली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरीप हंगामातसुद्धा अनेक पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागणार नाही, अशी व्यवस्था यंत्रणेमार्फत उभारून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात यावी.

सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे करून सरकारकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शाळेत गोल्ड मेडल, सिविल इंजिनियरिंग केलं,नंतर UPSC क्रॅक; IPS सृष्टी गुप्ता यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT