Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha Liquor Ban : वर्षभरात दारू विक्रीचे सात हजारांवर गुन्हे; दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील वास्तव

Wardha News : जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला तरीदेखील दारूचे वाहणारे पाट कमी होत नाही

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: दारूची अवैधपणे विक्री करण्यात येत असते. गावात होत असलेली विक्री थांबविण्यासाठी महिलांकडून एल्गार पुकारत गावात दारूबंदी करण्यात येत असते. तरी देखील छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच असते. अशाच प्रकारे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ७ हजार ४७६ अवैध दारूविक्री व दारू वाहतुकीच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. अर्थात दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे वास्तव पाहण्यास मिळत आहे. 

वर्धा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. यामुळे दारूबंदीचा जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. असे असताना देखील जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, तरीदेखील दारूचे वाहणारे पाट कमी होताना दिसून येत नाही. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे छुप्या पद्धतीने अवैधपणे दारूची विक्री होताना दिसत आहे. 

पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारू विक्री 

वर्ध्याच्या जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील अनेक दारू- विक्रेत्यांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरी देखील काही मुजोर दारू विक्रेते पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दारू विक्री करताना दिसतात. गल्लीबोळात सुरू असलेल्या दारू दुकानांमुळे त्रस्त झालेल्या काही गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात दारुविक्री करतअसल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिला पोलिस ठाण्याला फोन करून माहिती देता. गावकऱ्यांच्या दबावाखातर पोलिस संबंधित दारूविक्रेत्याला पोलिस ठाण्यात नेतात. मात्र, त्याच्यावर योग्य कलम लावल्या जात नसल्याने एका दिवसातच त्याची सुटका होते. परिणामी, दारू विक्रेत्यांची हिम्मत अधिकच वाढत चालली आहे.

२९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत 

जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. दरम्यान वर्धा जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण ७ हजार ४७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात एकूण तब्बल १ हजार ११४ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलिसांनी कारवाई करत २९ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

जिल्ह्यात अनेक पोलिस अधिकारी येऊन गेले, त्यांनी त्यांच्या स्तरावर दारूविक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला. काहींचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी- देखील झाला. अनेकांनी दारूची दुकाने बंद केली. काहींनी जिल्हा सोडला. व्यवसाय बदलवला. मात्र, आता पुन्हा दारूची दुकाने खुली झाल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT