Ambajogai Crime : बीड पुन्हा हादरलं! पोलीस चौकीसमोरच तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना

Beed News : जमीर शेख यास दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. मात्र जमीरने दारू पिण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. याचा राग श्रीहरी यास आला होता. हा राग मनात धरून तो तेथून निघून गेला होता
Ambajogai Crime
Ambajogai CrimeSaam tv
Published On

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकणामुळे बीड जिल्हा आधीच तापला आहे. त्यात आणखी एका हल्ल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई येथे पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत चौघांनी मिळून चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. 

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड मधील कायदा सुव्यवस्थ प्रश्न ऐरणीवर आला होता. विरोधकांनी आरोपावर आरोप करत रान उठवले होते. पोलीस अधीक्षक यांची बदली करण्यात आली. मात्र बीडमधील गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात अंबाजोगाई येथे पोलिस चौकीसमोरच कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले.

Ambajogai Crime
Shirdi Fake Darshan Pass : शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बनावट दर्शन पास; कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

अंबाजोगाईच्या सदर बाजारात वास्तव्यास असलेला जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख असे घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरच्या घटनेत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती नगरातील श्रीहरी दौलत मुंडे हा जमीर शेख यास दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. मात्र जमीरने दारू पिण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. याचा राग श्रीहरी यास आला होता. हा राग मनात धरून तो तेथून निघून गेला होता.

Ambajogai Crime
Pimpri Chinchwad : विनापरवानगी खाद्यपदार्थ विकल्यास २ लाखाचा दंड; विक्रीसाठी लायसन्स आवश्यक

जाब विचारत केला प्राणघातक हल्ला 

मात्र मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जमीर हा स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय समोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकी जवळील एटीएम समोर बोलावले. या ठिकाणी जमीर आला असता त्याला श्रीहरी याने तू मला शिवीगाळ का केली होतीस? असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला. तसेच श्रीहरी याच्यासोबत असलेल्या आर्यन मांदळे व अनोळखी दोघांनी देखील कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

तरुणाची प्रकृती चिंताजनक 

तर घटनेनंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जमीरवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तर ऐन पोलीस चौकीसमोर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com