Shirdi Fake Darshan Pass : शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बनावट दर्शन पास; कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Shirdi News : शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने संस्थानने पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले होते
Shirdi News
Shirdi News Saam tv
Published On

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेतात तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. मात्र या दर्शन पासमध्ये एजंट साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे. आता पुन्हा अशाच प्रकारे सशुल्क दर्शन पास देण्याच्या नावाने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले करण्यात आले होते. यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे; त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना देखील बनावट पास तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.  

Shirdi News
Cyber Crime : विदेश गिफ्ट पाठविल्याच्या नावे महिलेची फसणूक; २७ लाख ३८ हजार उकळले

कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल 

शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन पास देण्यात येत असते. भक्तांना सशुल्क दर्शन पासच्या नावाने फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी साई साईसंस्थानच्या प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्याविरोधात विविध कलमान्वये शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Shirdi News
Jat Yallama Devi Yatra : यल्लामा देवी यात्रा; जतमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दाखल, खिलार जनावरांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल

किती जणांचा सहभाग शोध सुरू 

शिर्डी संस्थांनच्या अधिकृत असलेल्या पास सारखीच साधर्म्य असलेल्या बनावट पास तयार करून भक्तांसह संस्थांनचीही फसवणूक उघड झाली आहे. यामुळे यात आणखीही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. बनावट पास विक्री प्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास होण गरजेचं आहे. अशी मागणी होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com