Jat Yallama Devi Yatra : यल्लामा देवी यात्रा; जतमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दाखल, खिलार जनावरांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल

Sangli News : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या सर्व दूर ख्याती असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात
Jat Yallama Devi Yatra
Jat Yallama Devi YatraSaam tv
Published On

सांगली : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्ताने दोन दिवसांपासूनच आकाश पाळण्यांसह विविध कर्मणुकीच्या साधनांसह हजारो व्यावसायिक या यात्रेत दाखल झाले आहेत. तसेच खिलार जनावरे या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते. कोट्यवधीची उलाढाल खिलार जनावरांच्या विक्रीतून या ठिकाणी होत असते.

सांगली जिल्ह्यातील जत नगरीचे ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या सर्व दूर ख्याती असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यामुळे भाविक याठिकाणी आता दर्शनासाठी आणि आपला नवस फेडण्यासाठी दाखल होत आहेत. आजचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होत आहे. 

Jat Yallama Devi Yatra
Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात; भरधाव डंपरने चिमुकल्याला चिरडले, संतप्त जमावाने पेटविला डंपर

देवीला उद्या दाखविला जाणार महानैवेद्य 

यल्लामा देवीच्या यात्रेत उद्या म्हणजे शुक्रवारी देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्याचा दिवस आहे. यामुळे नवस फेडणारे भाविक याठिकाणी पुरणपोळीचा नवैद्य दाढविण्यासाठी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने तयारी केली आहे. तर शनिवारी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आणि कीच कार्यक्रम आहे. नंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद राहणार आहे.  

Jat Yallama Devi Yatra
Cyber Crime : विदेश गिफ्ट पाठविल्याच्या नावे महिलेची फसणूक; २७ लाख ३८ हजार उकळले

खिलार जनावरांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध 
याशिवाय यात्रेत खिलार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध मानली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये जनावरे दाखल झाले आहेत. यामुळे हि जनावरे घेण्याऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यात्रेत खिलार जनावरे खरेदी- विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल याठिकाणी होत असते. बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा स्थळावर कृषी प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com