Bhandara Crime : लज्जास्पद! मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडं केली शरीरसुखाची मागणी; प्राचार्याचा पालकांनी कुटलं

Bhandara News : नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची परीक्षा झाली असून त्यातील काही विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य मुरकुट यांनी परीक्षेत पास व्हायचे असेल तर गुण वाढवून देतो असे आमिष
Bhandara Crime
Bhandara CrimeSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: परीक्षेत पास होण्यासाठी गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत प्राचार्यांकडून विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांनी जाब विचारत बेदम चोप दिला. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्यात आज घडला आहे. 

भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालय असून या ठिकाणी सुमारे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थीनी या नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची परीक्षा झाली असून त्यातील काही विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य किरण मुरकुट यांनी परीक्षेत पास व्हायचे असेल तर गुण वाढवून देतो; असे सांगत परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखविले. यासाठी विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

Bhandara Crime
Ambajogai Crime : बीड पुन्हा हादरलं! पोलीस चौकीसमोरच तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरातील घटना

संतप्त पालक महाविद्यालयात धडकले 

प्राचार्याने केलेल्या लज्जास्पद प्रकाराबाबत मुलींनी पालकांना तक्रार केली. मुलींसोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराबाबत आज संतप्त पालक नर्सिंग महाविद्यालयात दाखल झाले. यावेळी पालकांनी प्राचार्याला सदरच्या प्रकाराबाबत विचारणा केली. मात्र प्राचार्य मुरकुट यांनी उडवाउवीचे उत्तर दिले. यामुळे उपस्थित पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी प्राचार्याला बेदम मारहाण केली. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. 

Bhandara Crime
Pimpri Chinchwad : विनापरवानगी खाद्यपदार्थ विकल्यास २ लाखाचा दंड; विक्रीसाठी लायसन्स आवश्यक

पोलिसांच्या मध्यस्थीने प्राचार्य सुटले 

तर महाविद्यालयात प्राचार्यांना मारहाण होत असल्याबाबत काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी माहिती दिली. दरम्यान काही वेळाने पोलीस दाखल झाले. पोलिसांनी वेळीच दखल घेत प्राचार्य मुरकूट यांना पालकांच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेत सुटका केली. यानंतर विद्यार्थिनीचे जबाब घेतले जात असून भंडारा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com