Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : रात्रीची तपासणी बेतली जिवावर; बोटितून उतरताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, चौघे बचावले

Wardha News : चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी आटोपून ते परत केज (Kej) परिसराकडे जात असताना बोटीतून उतरताना तोल गेल्याने झालेल्या अपघातात अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चौघे कर्मचारी (Wardha) थोडक्यात बचावले. ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके यांच्यासह मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे (५७ रा. नागपूर), विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट (५८ रा. औरंगाबाद ह.मु. नागपूर), मयंक विजयसिंग ठाकूर (४० रा.गाझीयाबाद ह.मु. नागपूर ), सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे (३४ रा. बल्लारशह ह.मु. नागपूर) असे पाच अधिकारी बोर धरण येथील केजची तपासणी करण्यासाठी नागपूर येथून आले होते. रात्रीला जवळपास ८ वाजेनंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली. तपासणी करुन ९ वाजताच्या सुमारास परत केजकडे जात असताना (Selu) बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तेथील प्लास्टीकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरल्याने ते नदीपात्रात पडले. चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात खोलवर फसलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पण, काळोख असल्याने शोध लागू शकला नाही. घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्रीलाच कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळीच नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी धाव घेतली असून धरणातील पाण्यात मृतक युवराज फिरके यांचा शोध सुरु केला आहे. अद्यापपर्यंत बातमी मृतदेह सापडला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली आहे.

मद्यपान केल्याची चर्चा 

नागपूर येथील मत्स्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिसरात नेहमीचेच येणे जाणे असायचे. रात्रीला मासळी पकडण्यासाठी ते बोटीने जायचे. दारू पार्टी तर नेहमीच येथे व्हायची. शनिवारी देखील रात्रीला सर्वच पाचही जण मद्यधुंद अवस्थेत बोटीने नदीपात्रात गेले आणि परतत असताना  बोटीतून उतरतेवेळी पाचही जण घसरल्याने धरणाच्या पाण्यात पडले. चौघे बचावले पण एकाने जीव गमावला. पाचही अधिकारी मद्यधुंद अवस्थेत होते; अशी चर्चा परिसरात सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT