Wardha Rain News Saamtv
महाराष्ट्र

Wardha Rain News: वर्धा जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा! शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; बळीराजा संकटात

Wardha Rain News: कालपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसले. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता.११ फेब्रुवारी २०२४

Wardha unseasonal Rain:

राज्यातील वातावरणात बदल होऊ लागला आहे. हिवाळाच्या गारवा जाऊन आता उन्हाचे चटके सुरु झाले आहे. अशातच अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. कालपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसले. अशातच वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात (Wardha) आज (११, फेब्रुवारी) पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट झाली आहे. मागील अर्धा तासापासून वादळी वाऱ्यासह हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात गारपिट झालीय. यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. निंबूच्या आकाराची गार हिंगणघाट शहरसह इतर भागात रस्त्यावर विखूरलेली आहे.

या अचानक आलेल्या गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी संध्याकाळी वर्धा देवळी तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांच कंबरड मोडलं तर आज हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात गारपिटीने चांगलाच कहर केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, तूर, कापूस यासंह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जातं आहे. (Latest Marathi News) (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

SCROLL FOR NEXT